MNS
MNSteam lokshahi

दोन मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा नवीन दावा

पुण्येश्र्वर मंदिराजवळील परिसरात सुरक्षा वाढवली
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्याने सध्या या घटनेची देशभर मोठी चर्चा होत आहे. या मुद्द्यावरून दोन गट समोरासमोर आलेले असतानाच आता पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच पुण्यातल्या या मंदिरांच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

MNS
Sanjay Raut : अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंनी शिवबंधन नाकारल्यावर शिवसेना ठाम

मुघल आक्रमकांनी पुण्यातील पुण्यश्वर आणि नारायणेश्वर ही दोन मंदिरे पाडून तिथे दर्गा उभा केला. यातील एक मंदिर शनिवारवाड्याच्या समोर आहे, तर दुसरं मंदिर लाल किल्ल्याजवळ आहे, असं वक्तव्य अजय शिंदे यांनी केलं. याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारला पत्रही लिहिलं आहे. तसंच या मंदिरांसाठी मनसे आगामी काळात लढा उभारणार असल्याची घोषणा अजय शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्या या भूमिकेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनीही पाठिंबा दिला आहे.

MNS
“…म्हणून फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत”; सामनातून हल्लाबोल

पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराबाबत पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवत आहेत. मनसेनेही या मंदिरांच्या बाजूने भूमिका घेतली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका लावून धरली आहे. कालच्या सभेत मनसेने मशिदींवरचे भोंगे हटवण्याविषयीचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com