शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा
शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा

Gudi Padwa Melava: शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार? 

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS ) अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील जाहीर सभा कोरोनाच्या संकटामुळे होऊ शकली नाही. पण, मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवाजी पार्कवर ( Shivaji Park Dadar ) लाखो लोकांना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच भाषण ऐकता येणार आहे. त्यासाठी जवळपास 70 हजार पेक्षा जास्त लोकांसाठीची आसन व्यवस्था, लाऊडस्पीकर आणि एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्याततून महाराष्ट्र सैनिक उद्या शिवाजी पार्कमध्ये दाखल होणार आहे. उद्या आपल्या राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सगळ्याच लागली आहे. येणाऱ्या निवडणुका आणि सध्या सुरू असलेल्या राज्याच्या राजकारणावर राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार, हे पाहणं महत्वाचं असेल.

 महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी पक्ष संघटनेत फेरबदलही केले आहेत. मरगळ झटकून मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन होईलच, शिवाय सद्याच्या राजकीय घडामोडींवरही राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.

राज ठाकरे नेमके काय बोलणार?

या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमके काय बोलणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

महापालिकेची परवानगी 

मुंबईतील शिवतीर्थावर म्हणजेच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे होणाऱ्या (२ एप्रिल रोजी) मनसेच्या गुडीपाढवा मेळाव्याला महापालिकेकडून अटी-शर्थींसह परवानगी ( Permission with conditions ) दिली आहे. संध्याकाळी ५ ते १० या वेळात परवानगी असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष मनसेला शिवाजी पार्कवर मेळावा घेता आलेला नाही. त्यामुळे यंदा गुढी पाडव्याच्या निमित्ताने होणारा मेळावा जल्लोशात होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने काही महिन्यांवर आलेली पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असून मनसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com