raj thackeray and Mumbai Police
raj thackeray and Mumbai Policeteam lokshahi

...म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ मुंबई सोडण्याचे दिले आदेश

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.

घाटकोपर पोलिसांकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले होते. ACP आनंद नेर्लेकर यांनी यासंबंधीचे आदेश दिले. संपूर्ण मुंबईभर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ (Mumbai Section 144) आणि १८८ लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शहरात जमावबंदी आणि सरकारी आदेश लागू करण्यात आले आहेत.

raj thackeray and Mumbai Police
Dilip Walse Patil : राज्यातील कायदा संदर्भातबाबत आज गृहमंत्री घेणार बैठक

मुंबईतील कायदा आणि सुवव्यस्था बिघडू नये यासाठी मनसे तसेच इतर धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटिसा धाडल्या आहेत. सार्वजनिक शांतता बाधित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने २ मे ते १७ मे या कालावधीत मुंबईत वास्तव्यास राहू नये, असे काही कार्यकर्त्यांना नोटिशीमधून बजावण्यात आले आहे. मात्र १५ दिवस मुंबई सोडण्याची नोटीस दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com