माझे महात्मा गांधी फक्त राज ठाकरे, रामदास कदमांच्या टीकेला खेडेकरांचं प्रत्युत्तर

माझे महात्मा गांधी फक्त राज ठाकरे, रामदास कदमांच्या टीकेला खेडेकरांचं प्रत्युत्तर

Published by :
Published on

शिवसेना नेते अनिल परब हे राष्ट्रवादीचे संजय कदम आणि मनसेच्या वैभव खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी जोरदार टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली होती. त्याला मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून आहेत. माझे महात्मा गांधी एकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते? मातोश्री किंवा शिवसेनेचा आदेशही ते पाळत नाहीत. ही तर त्यांची कदम सेना आहे, असा टोलाही खेडेकर यांनी लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com