मराठीच्या मुद्द्यावरून ‘मनसे’चे पुण्यात ‘खळखट्याक’ आंदोलन

मराठीच्या मुद्द्यावरून ‘मनसे’चे पुण्यात ‘खळखट्याक’ आंदोलन

Published by :
Published on

मराठी भाषेवरून मनसे नेहमीच आक्रमक झालेली दिसते. काही दिवसांपूर्वी मनसेने अ‍ॅमेझोन' मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही' अशी भूमिका घेत अ‍ॅमेझोन विरुद्ध खळखट्याक आंदोलन सुरू केले होते. आता मनसेने आपला मोर्चा आता 'फोन पे' कंपनीकडे वळविला आहे. शुक्रवारी पुण्यात मराठी भाषेच्या वापरासाठी आक्रमक पवित्रा घेत फोन पे कंपनीविरुद्ध दंड थोपटत आंदोलन केले.

पुण्यात फोन पे कंपनीकडुन मराठी स्टिकर वापर न करता अन्य भाषिक कन्नड, तेलगु, गुजराती स्टिकर असंख्य आस्थापनावर लावले होते. याचा जाब विचारण्याकरता व अन्य भाषेत लावलेले स्टिकर काढून टाकण्यासाठी मनसेने हे आंदोलन केले.

पुण्यातील बाणेर येथील कार्यालयाला भेट देऊन १५ दिवसांत अन्य भाषेतील पुणे परिसरातील चिकटवलेले स्टिकर काढुन फक्त मराठीतच लावावेत यासाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. व अन्य भाषेतील ५००० पेक्षा जास्त फोन पे स्टीकरच जाळत निषेध व्यक्त करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com