मनसेच्या हायटेक सभासद नोंदणी कार्याला सुरुवात

मनसेच्या हायटेक सभासद नोंदणी कार्याला सुरुवात

Published by :
Published on

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेकडून सभासद नोंदणी कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा… असे म्हणत मनसेनं माणसं जोडायला, सभासद नोंदणी सुरू केली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही सभासद नोंदणी होत असून मोबावर मिस्ड कॉल देऊनही आपण सभासद होण्यासाठी मनसेकडे अर्ज करु शकता. विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनसेत सामील होण्याचं आवाहन केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरेंनी हे आवाहन केलंय.

मनसेच्या सोशल मीडियातून मनसे सदस्य नोंदणीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यभरातील मनसैनिकांची सदस्य नोंदणी सुरु झाली असून ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठी : https://mnsnondani.in या संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यातआलंय. तसेच, स्थानिक शाखेशी संपर्क साधूनही तुम्हाला मनसेचा अधिकृत सदस्य होता येणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देखील फेसबुक आणि ट्विटवर पोस्ट करून जनतेला आवाहन केले आहे. "विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे!", असे ट्विट राज यांनी केलंय. तसेच,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com