Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'या' दिवशी पुणे दौऱ्यावर

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'या' दिवशी पुणे दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे, बैठका घेतल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. 7 तारखेला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेणार असून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत ते संवाद साधणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर इथले पदाधिकारी 7 तारखेला पुण्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com