‘बार मालकांच झालं आता व्यापाऱ्यांकडून वसुली’,’मनसे’चा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यावर बार मालकांकडून वसुली आरोप होत असतानाचा आता व्यापाऱ्यांकडूनही कोरोना काळात वसुली केल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. या व्यापाऱ्यांकडून कोरोना काळात कशी लुटमार होतेय,या संबधित रेटकार्ड सुद्धा मनसेने समोर आणले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून हे आरोप केले आहेत.संदीप देशपांडे म्हणाले, आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून…! असे म्हणत त्यांनी मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू केली असल्याचा आरोप केला. या सबंधित त्यांनी दादर पश्चिमेतला व्हिडीओ पोस्ट केला.
कोरोना काळात सध्या प्रत्येक जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यानुसार मुंबईतही संध्याकाळी 4 वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सायंकाळी चार नंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठ्या दुकानांकडून 5 हजार तर त्याहून मध्यम दुकानांकडून 2 हजार आणि छोट्या दुकानांकडून 1 हजार रुपये वसुल केले जात आहेत. अशा संदर्भातले हे नवीन रेट कार्ड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.