मुंबईसह ठाण्यात फोडली दहीहंडी, मनसेकडून ठाकरे सरकारचा निषेध

मुंबईसह ठाण्यात फोडली दहीहंडी, मनसेकडून ठाकरे सरकारचा निषेध

Published by :
Published on

कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे, पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री करोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे.

ठाण्यात दहिहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. दहीहंडी साजरी करण्यावरून ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दहीडंडी फोडत राज्य सरकारच्या निर्बंधांचा निषेध करण्यात आला. तर सरकारच्या अटीला झुगारून मनसेने घाटकोपर येथील भटवाडी येथे राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला साजरा करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com