आदिवासी महिला मारहाण प्रकरणात मनसे आक्रमक; गुन्हा दाखल करा,अन्यथा आंदोलन
संदिप गायकवाड | वसईत आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. माञ मनसेनं याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत दोषी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी वसईच्या पापडी बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना वसई पोलिसांनी चोर समजून, पापडी बिट चौकीत नेऊन त्यांना दांड्याने मारहाण केली होती. याप्रकरणी आदिवासी संघटना, भाजपाच्या उपाध्यक्ष चिञा वाघ या आक्रमक झाल्या होत्या. त्या दोषी पोलिसांंच निलंबन करुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलिसांनी विनोद वाघ यांना निलंबितही करण्यात आले होते.
माञ पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर मनसेचे अविनाश जाधव यांनी असंतुष्ट असून दोषी अधिका-यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.