Mira-Bhayandar: घाणेरड्या पाणीपुऱ्या बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेची कारवाई

Mira-Bhayandar: घाणेरड्या पाणीपुऱ्या बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेची कारवाई

Mira-Bhayandar : भाईंदर पूर्वेकडील आजाद नगर भागात गलिच्छ ठिकाणी एका गाळ्यात पाणीपुरीची पुरी बनवणारा कारखाना चालवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Panipuri Factory In Bhayandar : भाईंदर पूर्वेकडील आजाद नगर भागात गलिच्छ ठिकाणी एका गाळ्यात पाणीपुरीची पुरी बनवणारा कारखाना चालवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या आधारे मनसेचे शहर अध्यक्ष सचिन पोपळे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस कारखान्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आझाद नगरच्या गल्ली क्रमांक दोन दशक नगर भागात अखेर तो घाणेरडा पाणीपुरी बनवणारा कारखाना सापडला.

तेथे सहा कामगार होते, हे सहा ही कामगार अर्धनग्न अवस्थेत पाणीपुरीच्या पुऱ्या बनवत असताना आढळले असून ते जमिनीवर पीठ मळून त्याचे गोळे करत होते. एका कोपऱ्यात तळण्यासाठी काळ्याकुठं घाणेरड्या कढईत तळण्यासाठी तेल होते आणि त्याच्याच बाजूला गटार उघडे होते सभोवताली घाणेरी भांडी होती अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याचा येथे खेळ मांडला होता.

Mira-Bhayandar: घाणेरड्या पाणीपुऱ्या बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेची कारवाई
Mumbai Local: पहाटेच्या धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

याची तक्रार मनसे शहर अध्यक्ष सचिन पोकळे यांनी अन्न आणि औषध प्रशासन यांना केली आहे. नवघर पोलिसांकडे देखील याची तक्रार दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या गलिच्छपुऱ्या बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून त्याची तपासणी केली आणि पंचनामा केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com