आमदार सुनील प्रभू यांचं पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र; म्हणाले...

आमदार सुनील प्रभू यांचं पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र; म्हणाले...

आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई शहरात आणि उपनगरात आज दि.२५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी दोन ते तीन तासांत अंदाजे २०० ते २५० मि.मि. पावसाची नोंद झाली या अतिवृष्टीमुळे सामान्य मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अशा तातडीच्या आपातकालीन परिस्थितीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी पाहवयास मिळाली. रस्त्यांवर वाहतूक निमंत्रक पोलिस उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरीकांना त्रास सहन करावा लागला.

याकरिता आपत्कालीन परिस्थितीतीमध्ये किंवा अतिवृष्टीच्या काळात वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत केल्यास मुंबईकर जनतेला आधार मिळेल.

त्याच प्रमाणे भारतीय हवामान खात्याने मुंबईत उद्या दि.२६ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ८.३० पर्यंत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवला आहे यामुळे मुंबईकर भयभीत झाले आहेत. तरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा अतिवृष्टीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता आवश्यक त्या उपाय योजना करण्यात याव्यात, ही विनंती. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com