मराठवाड्याचा शिल्लक अनुशेष भरून काढू – मंत्री कराड

मराठवाड्याचा शिल्लक अनुशेष भरून काढू – मंत्री कराड

Published by :
Published on

मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. आपण मंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा करत असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

नांदेडच्या दौऱ्यावर आल्यानंतर डॉ. कराड यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सोबतच अर्धापूर येथील उज्वला योजना, किसन योजना,दिव्यांग आणि शेतकरी आशा सर्व लाभार्थ्यांना भेटी देऊन समाधान व्यक्त केला.

मराठवाड्याचा अनुशेष शिल्लक आहे ,तो लवकरात लवकर भरण्यात येईल, मराठवाड्यात सिंचन, शेती, उद्योग आदी प्रश्नांवर भरीव निधी देणार असल्याचे केंद्रीय मंत्री कराड यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com