Mild tremors in Akola : अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. 5 वाजून 41 मिनिट आणि 18 सेकांदांनी बसला 3.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय भूकंपमापक केंद्राच्या संकेत स्थळावर भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचं केंद्र अकोल्यापासून 21 किलोमीटर अंतरावर असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती आहे. भूकंपामूळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप नोंद झाली नाही, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ही माहिती दिली. (Mild tremors in Akola)
दरम्यान, भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाने खबरदारीचा निर्णय म्हणून तातडीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.