महाराष्ट्र
गोरेगाव आणि पहाडीत म्हाडाच्या घरांच्या 'इतक्या' रुपयांची वाढ
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किंमतीत आता वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किंमतीत आता वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यात 1900 घरे पीएमएवाय योजनेत समाविष्ट आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये या योजनेतील घर 30 लाख 44 हजार रुपयांमध्ये विकले गेले असल्याची माहिती आहे.
आता गोरेगाव आणि पहाडीत म्हाडाच्या घरांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमतीत 1 लाख 92 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता या घरांसाठी पात्र विजेत्यांना 32 लाख 36 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.