”मर्चट नेव्ही आणि क्रुज सिफररर्सला प्राधान्याने लस मिळावी”

”मर्चट नेव्ही आणि क्रुज सिफररर्सला प्राधान्याने लस मिळावी”

Published by :
Published on

कोरोनाच्या वैश्विक महामारी विरोधात लढा देण्यासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. या योगदानात मर्चट नेव्ही आणि क्रुज सिफररर्सने दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही आहे. देशांतर्गत व विदेशातील विमानसेवा बंद असताना विविध गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी या घटकाने मोलाचा वाटा उचलला होता.मात्र याच घटकाला आता लसीकरणात प्राधान्य क्रमाने घेतले जात नाही आहे. त्यामुळे हे कर्मचारी नाराज असून प्राधान्याने लस मिळावी अशी मागणी करत आहेत.

 कोरोना काळात देश-विदेशातील सर्व व्यवहार ठप्प असताना मर्चट नेव्ही आणि क्रुज सिफररर्सने वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तु संपूर्ण जगभर पोहचवण्याचे काम न थांबता न थकता चोख बजावले. मात्र इतके करून सुद्धा लसीकरणात त्यांना अत्यावश्यक कर्मचाऱ्यांप्रमाणे लस देण्यात आली नाही. यासाठी त्यांनी 'नो व्हॅक्सीनेशन, नो जॉब हि मोहीम राबवली.मात्र यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. मात्र लसीकरणा संदर्भातल चित्र काही स्पष्ट झाल नाही.

ऑल इंडिया सिफररर्स अँड जनरल वर्कर्स यूनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे स्वत: सिफररर्स असल्याने त्यांनी कोरोना प्रतिबंधनात्मक लस प्राधान्याने सिफररर्सना मिळावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे. तसेच महाराष्ट्रात तातडीने लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. आत्ता डी जी शिपिंग कडून परिपत्रक १५/२०२१ मध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे संपूर्ण भारतात १२ मोठ्या बंदरांवर हॉस्पिटल्समध्ये लस घेता येण शक्य झाले आहे.

दरम्यान सध्या वसई विरारमध्ये स्वत: कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या सांगण्यानूसार वसई विरार लसीकरण केंद्रावर पाच सिफररर्सचे लसीकरण यूनियनच्या मदतीने केले जाते. हे प्रमाण फारच कमी आहे पण यात नक्कीच वाढ होईल असा विश्वास ऑल इंडिया सिफररर्स अँड जनरल वर्कर्स यूनियनकडून व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com