Maratha Reservation; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक संपली…

Maratha Reservation; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक संपली…

Published by :
Published on

मराठा आरक्षणप्रश्नी कोंडीत सापडेल्या ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकींचा धडाकाच लावला आहे. आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची स्वविस्तर माहिती लवकरच हाती येणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर घेण्यात आलेली बैठक संपली आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणाचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com