सोलापूरमध्ये महापालिका सभेत भाजप नगरसेवकाने घातला गोंधळ,महापौरांनी केले निलंबित

सोलापूरमध्ये महापालिका सभेत भाजप नगरसेवकाने घातला गोंधळ,महापौरांनी केले निलंबित

Published by :
Published on

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना भाजपचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी भाजपचाच महापौर श्रीकांचना यंन्नम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली,महापौर जातीयवादी असल्याच्या घोषणा त्यांनी दिल्या तसेच अपमानकारक शब्दांत वाद घातला हे करत असताना विरोधी पक्षातील नगरसेविका श्रीदेवी फुलरे यांनी सुरेश पाटील यांचा माईक बंद पाडला त्यामुळे रागाने पाटील यांनी माईक फेकून दिला तसेच महापौरांचा देखील माईक तोडला.
त्यामुळे स्वतःच्याच पक्षातील नगरसेवकाला निलंबित करण्याची नामुष्की महापौरांवर ओढवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com