महाराष्ट्र
Maratha Reservation : शिंदे समितीचा आज हैदराबाद दौरा
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. आता मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा आयोजित केल्या जातात. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात.
मराठा आरक्षणासाठी एक समितीची तयार करण्यात आली आहे. ही शिंदे समिती आज हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेलंगणा सरकारकडून निजामकालीन कागदपत्रांमध्ये उर्दू किंवा अन्य भाषांमध्ये असलेल्या नोंदी मिळविण्यासाठी ही समिती हैदराबादला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरची शेवटची तारीख दिली आहे. त्यामुळे यासाठी सरकार वेगाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात आणखी पुरावे मिळविण्यासाठी न्या. संदीप शिंदे समिती बुधवारी हैदराबादला जाणार आहे.