नक्षलसप्ताह | ८ लाख रुपये बक्षीस असणाऱ्या माओवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलसप्ताह | ८ लाख रुपये बक्षीस असणाऱ्या माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Published by :
Published on

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच ८ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा वय ३२ वर्ष रा. बोटेझरी, पोमके गॅरापत्ती ता. कोरची जि. गडचिरोली व कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची वय ३३ वर्ष रा. गौडपाल ता मानपूर जि. राजनांदगाव यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणुन कार्यरत होता व त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा यांचेवर खूनाचे १३, चकमकीचे २१ , जाळपोळ १ व इतर ५ असे गुन्हे दाखल असुन पत्नी कविता हीचेवर चकमकीचे ५, जाळपोळ १ व इतर ३ असे गुन्हे दाखल आहेत.

असून शासनाने विनोद बोगा याचेवर ०६ लाख रूपयाचे तर कविता कोवाची हिचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२१ सालामध्ये एकुण ४३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, ३३ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालीवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com