मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईतील आझाद मैदानावर जाणार नाही, आज रात्रीपर्यंत...

मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईतील आझाद मैदानावर जाणार नाही, आज रात्रीपर्यंत...

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा नवी मुंबईत आला आहे. अशात, सरकार शिष्टमंडळाने चर्चा केली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत संवाद साधला.
Published on

मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा नवी मुंबईत आला आहे. अशात, सरकार शिष्टमंडळाने चर्चा केली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत संवाद साधला. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नव्हती. आमची अशी इच्छा आहे की आजच्या रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. त्यावर सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तरीही माझं म्हणणं आहे की अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या, रात्रीतून द्या. २६ जानेवारीचा आणि कायद्याचा आम्ही सन्मान करुन आम्ही आजची रात्र इथेच काढतो, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मात्र, अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईतील आझाद मैदानावर जाणार नाही, आज रात्रीपर्यंत...
Sanjay Raut: मराठा आरक्षणावरुन राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला 'हा' मोठा सल्ला

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण शासनाला महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. आपण त्यासाठीच इथपर्यंत आलो आहोत. आज सरकारच्या प्रतिनिधींशी माझी चर्चा झाली. सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. सुमंत भांगे हे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांचे काय काय निर्णय आहेत ते आपल्याला सांगितलं आहे. भूमिका तुमच्या समोर ठेवत आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. तर तुम्ही प्रमाणपत्र वाटप करा. माझी नोंद सापडली की नाही त्यावर प्रमाणपत्र अर्ज करता येईल. काही जणांनी अर्ज केला नाही.

जर नोंद मिळाली आणि माहिती नसेल तर तो अर्ज कसा करेल. त्यासाठी तुम्ही कॅम्प लावा. २० जानेवारी पासून त्यांनी शिबिरे गावोगावी सुरु केले आहेत. ५४ लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील. ज्या नोंदी मिळाल्यात त्यांना व परिवाराला प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्याच आधारावर प्रमाणपत्र द्यावे. १ नोंद मिळाली तर काही ठिकाणी ७० ते २०० जणांना लाभ मिळाला. एका नोंदीवर पाच फायदे मिळाले तरी २ कोटी मराठा समाज आरक्षणात जातो.

वंशावळ जोडायला काही कालावधी लागेल. त्यासाठी समिती गठीत करण्यासाठी एक शासन निर्णय काढला आहे. त्यात तहसीलदार, मोडी लिपीचे अभ्यासक, पोलीस अधिकारी असतील वंशावळ मिळाली म्हणजे त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी मिळाली त्या परिवाराने अर्ज करणे गरजेचे. तर त्यांच्या कुटुंबियांना प्रमाणपत्र मिळेल. समाज म्हणून अर्ज करण्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल. ज्यांचा नोंद मिळाली त्यांना चार दिवसांत प्रमाणपत्र देण्याचे आपण त्यांना सांगितले आहे. अर्ज करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीने काम करत राहायचे. नोंद शोधत राहायचे. त्यांनी २ महिन्यांची मुदत वाढवली आहे. १ वर्षे वाढवण्याची मागणी केली होती. ही टप्प्याटप्प्याने वाढवणार आहेत. सर्वात महत्त्वाचे सगेसोयरे शब्द हा शासन आदेश काढा. त्यात सगेसोयरे अधिसूचना व अध्यादेश येणार आहे. तो ५४ लाख नोंदी व त्या परिवारात नोंद आहेत. ज्यांच्या नोंद नाहीत त्यांनी शपथपत्र द्यायचे आहे. त्याआधारे प्रमाणपत्र द्यायचे आहे. शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्यायचे आहे. त्याची गृह चौकशी करा. खोटा पाहुणा असेल तर देऊ नका, असेही जरांगेंनी सांगितले.

१०० रुपयांच्या बाँडवर घेतले तर आमचे पैसे जातील. ते मोफत करा. अंतरवाली सराटी मधील सगळे गुन्हे मागे घ्या अशी मागणी केली. गृह विभागाकडून ही प्रक्रिया मागे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याचे पत्र नाही. बैठकीत अभिप्राय दिला आहे. भांगे साहेबांना ही विनंती आहे ते पत्र लागणार आहे, अशीही मागणी त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com