जरांगेंच्या सभेदरम्यान गोंधळ! बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याची तरुणाची धमकी
राजगुरुनगर : पुण्यातील राजगुरूनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेत एका तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जरांगेंशी बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही तरुणाने दिली. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत तरुणाला वेळीच रोखलं. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजगुरूनगरमधील सभेत मनोज जरांगे यांचे भाषण संपलं आणि एक तरूण अचानक मंचावर चढला. यावेळी या तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. तरुणाने स्टेजवर येऊन माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच, जरांगेंशी बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही तरुणाने दिली. पोलिसांनी आणि उपस्थित आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेले.
दरम्यान, सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होते आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.