Manoj Jarange Patil : घरी राहू नका ही शेवटची आर - पारची लढाई; येताना आरक्षण घेऊनच येणार
मनोज जरांगे पाटील सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 26 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत. मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणाची झुंज देण्यासाठी मुंबईकडे निघालो. 7 महिने सरकारला आम्ही वेळ दिला. मराठा समाजाची एकजूट तुटू देऊ नका. घरांघरातील मराठ्यांनी 26 जानेवारीला घराबाहेर पडा. मराठा समाजाने मला साथ द्यावी. मराठ्यांचा मुंबईत कोटींचा आकडा दिसेल. मुंबईत आम्ही खिंड लढवणारच. शेवटती लढाई ही आरपारची. आता घरात राहू नका. कुणालाही त्रास होईल असं वागू नका, शांततेत आंदोलन करा. उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. येताना आरक्षण घेऊनच येणार.
शांततेत आंदोलन करणार. उपोषण सुरु करत मुंबईकडे निघणार. सरकारसोबत आता कुठलही बोलणं झालेलं नाही. माझ्या समाजाला विचारुन मी निर्णय घेईन. अंतरवाली आमरण उपोषण करत मुंबईकडे रवाना होणार. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत काहीच घडत नाही. पायी चालताना रॅलीत कुठलाही वाद घालू नका. सरकार किती निर्दयी झालंय. ज्यांच्यामुळे सरकार गादीवर बसले आहे, त्यांना आरक्षण दिलं जात नाही. मराठा मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. मी असेन नसेन माहित नाही, पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं. काही झालं तरी चालेल आता माघार नाही. उपोषणामुळे शरीर साथ देत नाही मात्र आरक्षण टोकाचे. मराठआ आरक्षणासाठी अनेकांचे बलिदान. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.