Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना सरकार निवडणुका घेणार नाही

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना सरकार निवडणुका घेणार नाही

सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारचा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन. आज दिशा ठरवणारच. आता आंदोलन थांबणार नाही. सरकारने आणखी शहाणं व्हावं. आमच्या पुढे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सरकारनं आरक्षण दिलं पण अजूनही अधिसूचनेची अंमलबजावणी नाही. आंदोलनाची दिशा ठरवल्यानंतर माघार नाही. मला यात राजकारण करायचं नाही.

मराठा समाज सरकारवर नाराज. मोटारसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता. विश्वासघात होईल असं वागू नये. मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या. आरक्षण दिलं असतं तर 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं. अधिसूचनेची अंमलबजावणी करा. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसणार. मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना सरकार निवडणुका घेणार नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना सरकार निवडणुका घेणार नाही
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची दिशा ठरवणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com