SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधानसभेत हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे कोण याची चौकशी करा. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. अशी आशिष शेलार यांनी मागणी केली आहे. यावरुनच आता विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चांगल आहे. मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या मग. मला भीती नाही फक्त अर्धवट चौकश्या करू नका. मी परवाच बांधवांना सांगितलं, मला गुंतवण्याची प्रयत्न होतोय. तू इकडे कशाला षडयंत्र करतो? मीच तुझ्या घरी येतो. समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे. मी निर्भिड आहे म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय मी थांबणार नाही
तुला काय करायचं ते कर. एसआयटी त्याचसाठी आहे ना. माझं जर सगळं खरं निघालं तर फडणवीस यांना तुरुंगात जावं लागेल. मला माहितीये मीच माघारी आलोय की, कोण घेऊन आलोय. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.