मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; कसा असेल दौरा?
मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. आळंदीमध्ये मनोज जरांगेंची आज मिरवणूक असणार आहे. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज व आळंदीकरांच्या वतीने त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर मनोज जरांगे पाटील माऊलींचं सायंकाळी दर्शन घेणार आहेत.
10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. दहा तारखेला उपोषण करणार असा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे हे या उपोषणाच्या आधी हा महाराष्ट्र दौरा करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा दौरा
६ फेब्रुवारी २०२४:-
अंतरवालीहून शिक्रापूर मार्गे चाकण आळंदी देवाची, आळंदी येथे नियोजित कार्यक्रम सायंकाळी ६.०० वाजता, व मुक्काम.
७ फेब्रुवारी २०२४:-
आळंदीहून चाकण मार्गे खोपोली मार्गे- पनवेल मार्गे-कामोठे येथे सकाळी ११.०० वा. नियोजित कार्यक्रम त्यानंतर नवी मुंबई मार्गे-चेंबूर मार्गे- शिवाजी मंदिर, दादर मुंबई येथे सायं. ६:०० वा. नियोजित कार्यक्रम
८ फेब्रुवारी २०२४:-
दादर मुंबईतून-नाशिक मार्गे सटाणा मार्गे-साल्हेर किल्ला नियोजित कार्यक्रम स.११.०० वा. त्यानंतर साल्हेर किल्याहून छ. संभाजीनगर मार्गे - अंतरवाली..
१ फेब्रुवारी २०२४:-
अंतरवालीहून-भोगलगाव येथे स. १०:०० वाजता, नियोजित कार्यक्रम, त्यानंतर भोगलगावहून-बीड मार्गे - कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी १२ वाजता, नियोजित कार्यक्रम त्यानंतर जामखेड मार्गे-श्रीगोंदा रात्री ०८:०० वा.-बीड-गेवराई मार्गे-अंतरवाली.
१० फेब्रुवारी २०२४:-
अंतरवाली सराटी येथे सकाळी १० वाजता, महत्वाची बैठक व त्यानंतर श्री. मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.