महाराष्ट्र
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची दिशा ठरवणार
सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे.
दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी म्हणून जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली आहे.