Manoj Jarange Patil : बीडमध्ये आज मनोज जरांगेंची इशारा सभा

Manoj Jarange Patil : बीडमध्ये आज मनोज जरांगेंची इशारा सभा

बीड येथे आज मनोज जरंगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बीड येथे आज मनोज जरंगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने मोठी तयारी करण्यात आली आहे. एकूण शंभर एकरात ही सभा पार पडणार असून यासाठी लाखो मराठा समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जरांगे सभास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी कालावधी दिला होता. तो कालावधी उद्या संपत आहे त्यामुळे या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मनोज जरांगे हे दुपारी दोनच्या सुमारास बीडमध्ये सभास्थळी पोहचतील.  

या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठे होर्डिंग्ज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले आहे. याच सभेमधून 24 डिसेंबरनंतरची आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे बीडमधील सकल मराठा बांधवांच्यावतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली. त्यामुळे या सभेतून मनोज जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com