सामूहिक कट रचून आमच्यावर हल्ला केला; जरांगे पाटलांचा आरोप

सामूहिक कट रचून आमच्यावर हल्ला केला; जरांगे पाटलांचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असतानाही त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे.
Published on

जालना : सामूहिक कट रचून आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असतानाही त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच, एका दिवसात अध्यादेश काढता येईल इतके रिक्षाभर पुरावे आम्ही देतो. आता सरकारनं वेळ मागू नये, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

सामूहिक कट रचून आमच्यावर हल्ला केला; जरांगे पाटलांचा आरोप
अध्यादेश काढता येईल इतके रिक्षाभर पुरावे आम्ही देतो; जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कागदपत्रं पुरावे देतो तुम्हाला पाळायची गरज नाही. त्यांनी आमची अडचण समजून घ्यायला हवी. जनतेला आम्ही वेठीस धरत नाही तर सरकारच वेठीस धरत आहे. हे मुलांनी उभा केलेलं हे आंदोलन आहे. आमच्यावर भयानक कलम लावले आहे. आमच्यावर कट रचून तुमच्या अधिकाऱ्यांनी हल्ला केला. सगळ्या केस पोलिसांवर पडायला हव्यात. नाहीतर मी राष्ट्रपती यांच्याकडे क्रॉस कंप्लेंटची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 2 सलाईन लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर या प्रकरणी सरकारकडे कोणाताच तोडगा काढला नसून विशेष अधिवेशनात या प्रकरणी केंद्र सरकारनं घटना दुरूस्ती करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com