पठ्ठ्यानं चक्क विमानातच ओढली बिडी; पोलिसांनी 
केलं अटक

पठ्ठ्यानं चक्क विमानातच ओढली बिडी; पोलिसांनी केलं अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ४२ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी विमानाच्या शौचालयात 'बिडी' ओढल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
Published by :
shweta walge
Published on

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ४२ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी विमानाच्या शौचालयात 'बिडी' ओढल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. हा माणूस दिल्ली-मुंबई विमानाने उड्डाण करत होता. दुर्गंधीमुळे क्रू मेंबर्सना संशय आला आणि तपासणी केल्यावर त्यांना टॉयलेटमध्ये 'बिडी' आढळून आली.

मोहम्मद फकरुद्दीन मोहम्मद अमरुद्दीन असे या प्रवाशाचे नाव असून, तो इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून मुंबईला जात होता आणि शौचालयात विडी ओढत होता.

बिडीच्या उग्र वासामुळे क्रू मेंबर्सना संशय आला आणि तपासणी केली असता त्यांना शौचालयात बिडी आढळून आली. चौकशी केली असता, अम्रुद्दीनने आपण बिडी ओढत असल्याची कबुली दिली आणि विमान मुंबईत उतरल्यावर सहार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३३६ आणि विमान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पठ्ठ्यानं चक्क विमानातच ओढली बिडी; पोलिसांनी 
केलं अटक
Amit Shah : विरोधकांवर टीका करत अमित शाह यांचं जोरदार भाषण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com