पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची घेतली भेट…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची घेतली भेट…

Published by :
Published on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीक नेमक्या काय चर्चा होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. मैत्रीपुर्ण ही भेट होती. त्यानंतर आज त्यांनी मता बॅनर्जी यांनी मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीचे त्यांनी संकेत दिले आहेत. तर आता ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या आहेत.

त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी नव्या आघाडीच्या तयारीत तर नाही ना? अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचेच संकेत ममता बॅनर्जी यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलताना दिले!

देशात भाजपाला पराभूत करायचं असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. "जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पराभूत करणं सोपं आहे", असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी नमूद केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com