महाराष्ट्रात मोठा घातपातचा कट; अतिरेक्यांचा पुन्हा समुद्रामार्गे घुसण्याचा प्रयत्न?
महाराष्ट्रात एकीकडे दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना रायगड मधून खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोटीमध्ये शस्त्र सापडली असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. प्रत्येक वाहनाचीही कसून चौकशी तपास पोलिसांकडून केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात सकाळच्या सुमारास हरिहरेश्वरचा समुद्र किनाऱ्यावर बोट आढळून आली होती. सुरुवातील ही बोट स्थानिक मासेमारांची असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. पोलिसांनी बोट ताब्यात घेऊन बोटीची तपासणी केली असता. अखेर या बोटीत शस्त्रास्त्र आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
मुंबईत मोठ्या घातपाताचा प्रयत्न
पुढील काही दिवसात येऊ घातलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी जमते याचाच फायदा घेत दहशतवाद्यांनी मोठा कट रचला होता. मात्र, रायगड जिल्ह्यात सकाळच्या सुमारास हरिहरेश्वरचा समुद्र किनाऱ्यावर बोट आढळून आली. AK 47 बंदुका या बोटीत आढळून आल्या असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. पोलिसांकडूनही या संपूर्ण प्रकरणी कमालीची गुप्तता बाळगली जात असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.