Shivsena | NCP | Congress
Shivsena | NCP | CongressTeam Lokshahi

17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा शिंदे- फडणवीस सरकार विरोधात महामोर्चा

राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेना(ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने या तिन्ही पक्षांनी पत्रकार परिषदेत घेत शिंदे- फडणवीस सरकार विरोधात महामोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याने हा मोर्चा काढण्यात येत आहे. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Shivsena | NCP | Congress
ठाकरे- आंबेडकर युतीवर दानवेंचे विधान; म्हणाले, एकत्र येण्याबाबत आपण घाई करू नये...

सत्ताधाऱ्यांविरोधात येत्या 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत.

तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान धुळीस मिळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय." असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, येत्या 17 तारखेला अतीभव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवलं पाहिजे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विरोट मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सामिल व्हावं. हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com