महाराष्ट्राचा लसीकरणात विक्रम…

महाराष्ट्राचा लसीकरणात विक्रम…

Published by :
Published on

महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत आज एक विक्रम नोंदिविला आहे.आज दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.एकाच दिवसात मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.या विक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती, त्यात आजच्या लसीकरणाच्या सर्वोच्च संख्येने अजून एक नवा विक्रम केल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

"कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात मोठ्या संख्येने नागरीकांचे लसीकरण होऊ शकते.महाराष्ट्रात दिवसाला १० लाख लसीकरण होत असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे". असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com