Maharashtra ZP Panchyat Samiti Elections | या जिल्ह्यातील तीन प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली

Maharashtra ZP Panchyat Samiti Elections | या जिल्ह्यातील तीन प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली

Published by :
Published on

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 18 गटांसाठी 35 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणुकीचे चित्र भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असे पाहायला मिळत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात माघारी अंती शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध झाल्याने त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्येने कोळदे गटातून राजकारणात पदार्पण केले आहे, तर आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या भगिनीने खापर गटातून भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्याविरुद्ध जोरदार टक्कर दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांनी पुन्हा कोपरली गटातून निवडणूक लढवली आहे त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये कोण वर्चढ ठरेल हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com