Maharashtra TET Exam :टीईटी परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. तीन वर्षांनंतर होणाऱ्या परीक्षेला राज्यातून 3 लाख 53 हजार 937 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. 'पेपर-१' च्या तुलनेत 'पेपर-२' साठी परीक्षार्थींची संख्या मोठी आहे. परीक्षा निश्चित तारखेलाच होणार असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आलंय. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिकचा आधार घेतला जाणार आहे.
राज्यभरातील १ हजार २९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र टीईटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन पेपर द्यावे लागतील. उमेदवाराचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत होईल. तर, दुसरा पेपर त्याच परीक्षा केंद्रावर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होईल.
महाराष्ट्र टीईटी परीक्षा अधिक पारदर्शक होण्यासाठी यावेळेस परीक्षा ऑनलाइन घेण्याची योजना होती. परंतु, तांत्रिक कारणांमुळे ती रद्द करावी लागली.