TET scam | टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

TET scam | टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

Published by :
Published on

टीईटी गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखरेदव ढेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरुमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे.या कारवाईमुळे आणखी मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखरेदव ढेरे यांनासंगमनेर येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर बंगळुरू येथून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.२०१७ पासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षांसंदर्भात कंत्राट दिल्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे २०१७ पासून भरती झालेले उमेदार संशयाखाली आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com