SSC Board Exam | आजपासून राज्यात दहावी बोर्डाची परीक्षा
बारावीच्या परीक्षेत सुरू असलेल्या पेपरफुटीच्या गोंधळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( Maharashtra ssc exam 2022 ) दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 478 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने यंदा इयत्ता बारावी व दहावीची ऑफलाईन
(offline exam) परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार, ता. ४ मार्चपासून सुरू झाली झाली आहे. आता मंगळवार, ता. १५ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या (corona update ) पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण झाले असतानाच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, मंडळाने राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 ची दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी हे नऊ विभागांपैकी मुंबई विभागातील आहे. मुंबई विभागात तीन लाख 73 हजार 840 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नोंदणी केली आहे. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 122, पालघर जिल्ह्यात 61 हजार 866, रायगड जिल्हात 36 हजार 996, मुंबई पश्चिम 65 हजार 497, मुंबई उत्तर 51 हजार 868 आणि मुंबई दक्षिण 33 हजार 590 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
15 मार्च – प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च – द्वितीय किंवा तृतीय भाषा
19 मार्च – इंग्रजी
21 मार्च – हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च – गणित भाग – 1
26 मार्च – गणित भाग 2
28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 2