महाराष्ट्र
राज्यातील शाळा 100 टक्के क्षमतेनं सुरू
मागच्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या राज्यभरातील शाळा आता संपूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या राज्यातील शाळा ह्या निर्बंधांसह सुरू आहेत. आता सर्व शाळा 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्यात येणार आहेत. असा आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. पहिली ते नववीची परीक्षा एप्रिल महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात तर, अकरावीची परीक्षाही एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात यावी. असा निर्णस घेण्यात आला आहे.
शनिवार व रविवारीही शाळा सुरू राहणार?
एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा असावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तर, रविवारी ऐच्छिक स्वरूपात वर्ग सुरू करावेत असंही सांगण्यात आलंय.