Mucormycosis | महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे 9 हजार 268 रुग्ण

Mucormycosis | महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे 9 हजार 268 रुग्ण

Published by :
Published on

राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यत राज्यात म्युकरमायकोसीसचे 9 हजार 268 रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने या संदर्भातील माहिती दिली.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 9 हजार 268 रुग्ण आढळून आले आहेत. यामधून 5 हजार 91 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 ह्जार 112 रुग्णांचा म्युकरमायकोसीसमुळे मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 900 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात सर्वाधिक म्युकरमायकोसीसचे रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि मुंबई या जिल्ह्यात आढळून आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com