Rainfall Update | पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Rainfall Update | पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

मुंबई, मुंबई उपनगरासह कोकणामध्ये (Kokan Rain) पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून (Monoon) सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुंबईत पावसानेही दमदार एन्ट्री घेतली असून मुंबईसह (Mumbai) कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy To Heavy Rainfall) पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह कोकणामध्ये (Kokan Rain) पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून (Monoon) सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

Rainfall Update | पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
सातवा आठवडा : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही

आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परिणामी दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे पावसामुळे लोकल ट्रेन्सचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे कालपासूनच लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पावसाचा सध्याचा जोर पाहता आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

Rainfall Update | पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
भाजपचा मास्टरस्ट्रोक; हीच खरी रणनीती

4 ते 5 दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला सुरुवात करता येईल.

काल दिवसभरात रत्नागिरी येथे ८३, अलिबाग येथे ५२, डहाणू येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभाग सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, महाबळेश्वर आणि सांगली येथे अनुक्रमे ९, ८ आणि ५ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भात अमरावती येथे १६ आणि यवतमाळ येथे १४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. बुलडाणा येथे ६, तर नागपूर येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com