Maharashtra IAS Officers Transfer | महाराष्ट्रातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra IAS Officers Transfer | महाराष्ट्रातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Published by :
Published on

राज्यात 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. बदल्या करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची यादी पाहूयात.

बदली झालेले अधिकारी

  • ओ. पी. गुप्ता (1992 च्या बॅचचे आएएस अधिकारी) यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
  • विकास चंद्र रस्तोगी (1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • इंद्रा मल्लो (1999 च्या बॅचच्या आएएस अधिकारी) यांची एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबईचे आयुक्त पदावरुन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अजित पाटील (2007च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथून सहसचिव पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे.
  • रुबल अग्रवाल (2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी) यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पदावरुन आता आयसीडीसी नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • दौलत देसाई (आयएएस 2008 बॅच) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी मुंबईत झाली.
  • रुचेश जयवंशी (आयएएस: एमएच: 2009) जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी करण्यात आली.
  • संजय यादव (आयएएस: एमएच: 2009) यांची बदली एमएसआरडीसी, मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून झालीय.
  • शैलेश नवाल (आयएएस: एमएच: 2010), जिल्हाधिकारी, अमरावती यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्त करण्यात आलंय.
  • आर. एच. ठाकरे (आयएएस: एमएच: 2010) यांना नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलंय.
  • जे. एस. पापळकर (आयएएस: एमएच: 2010) अकोला जिल्हाधिकारी यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय
  • जी. एम. बोडके (आयएएस: एमएच: 2010)यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदावरून हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
  • राहुल अशोक रेखावार (आयएएस: एमएच: 2011) यांची अकोल्याचे एमएस एसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय
  • रवींद्र बिनवडे (आयएएस: एमएच: 2012) यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदावरून थेट पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आलीय
  • दीपककुमार मीना (आयएएस: एमएच: 2013) यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
  • पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता.
  • विजय चंद्रकांत राठोड यांना जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • निमा अरोरा यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • डॉ. बी.एन.पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com