Maharashtra HSC Result 2021: या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार?

Maharashtra HSC Result 2021: या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार?

Published by :
Published on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला आहे.

पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नाही.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. जुलैअखेर इयत्ता १२ वी निकाल लागेल असं म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक कामे थांबली आहेत. यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com