Maharashtra Corona | राज्यात ३५ हजार ७५६ कोरोनाबाधित
महाराष्ट्रात आज ३५ हजार ७५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले.दिवसभरात राज्यात एकूण ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.आज ७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.
महाराष्ट्रात आज ३५ हजार ७५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ७६ लाख ५ हजार १८१ इतकी झालीय. यापैकी सध्या एकूण २,९८,७३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात राज्यात एकूण ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण ७१ लाख ६० हजार २९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१५ टक्के एवढे झाले आहे.राज्यात आज ७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ३१६ कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
एकही ओमायक्रॉन बाधित नाही
राज्यात आज एकही ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळला नाही. सध्या ओमायक्रॉनबाधितांची संख्या २ हजार ८५८ इतकी आहे. यापैकी १ हजार ५३४ रुग्णांना त्यांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.