महाराष्ट्र
Maharashtra Corona : राज्यात ९ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
राज्यात आज १ लाख २३ हजार २२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. ३ हजार ३७८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.आजपर्यंत १ लाख २३ हजार ०३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.