Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात ४ हजार ६६६ नवीन करोनाबाधित; १३१ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात ४ हजार ६६६ नवीन करोनाबाधित; १३१ रुग्णांचा मृत्यू

Published by :
Published on

कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर अद्याप सुरूच आहे. त्यामुळे राज्यावरील कोरोना संकटाचा धोका अद्याप टळलेला नाही. राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले असल्याने, सर्वच ठिकाणी गर्दी वाढली आहे. परिणामी रुग्ण संख्येत वाढ सुरू आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर ३ हजार ५१० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६३,४१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,५६९३९ झाली आहे. राज्यात १३,७,१५७ कोरोनाबाधित रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला. तर, सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com