राज्यात चोवीस तासात ५ हजार ४२४ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९६.८७ टक्के

राज्यात चोवीस तासात ५ हजार ४२४ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९६.८७ टक्के

Published by :
Published on

देशभरात कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. राज्यातील परिस्थिती देखील काही ठिकाणी नियंत्रणात आली आहे. मात्र अद्याप राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असले तरी करोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत असल्याने, काहीसा दिलासा वाटत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

आज दिवसभरात राज्यात ५ हजार ४२४ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार ४०८ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, ११६ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील आज नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०१,१६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.८७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या ६४,०१,२१३ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३५२५५ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com