Maharashtra corona | राज्यात ३ हजार ६३ नवीन बाधित

Maharashtra corona | राज्यात ३ हजार ६३ नवीन बाधित

Published by :
Published on

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहे. आज दिवसभरात ३ हजार १९८ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ५६ कोरोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

आज दिवसभरात ३ हजार १९८ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६३,७१,७२८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.२७ टक्के एवढे झाले आहे.

३ हजार ६३ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,५०,८५६ झाली आहे. ५६ कोरोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत १३९०६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com