Maharashtra Corona | राज्यात २ हजार २१९ नवीन बाधित

Maharashtra Corona | राज्यात २ हजार २१९ नवीन बाधित

Published by :
Published on

राज्यात ३ हजार १३९ रुग्ण कोरोनामधून बरे झाले असून, २ हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहेत. आज दिवसभरात २ हजार २१९ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ८३ हजार ८९६ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २९ हजार ५५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात ३ हजार १३९ रुग्ण कोरोनामधून बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६४ लाख ११ हजार ०७५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३८% एवढे झाले आहे. राज्यात आज ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com