Cabinet meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; चक्रीवादळांच्या उपाययोजनांसाठी कोकणला 3 हजार कोटी
राज्य सरकारने चक्रीवादळाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहेत.
तौत्के, निसर्ग चक्रीवादळ व अतिवृष्टीने कोकण तसेच पश्चिम महाऱाष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
कोकणातील जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तींशी सामना करता यावा यासाठी हा निधी कोकोणाला दिला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तीन हजार कोटी रुपायांतून वेगवेगळी कामे केली जातील. यामध्ये प्रामुख्याने धूप प्रतिबंधक बंधारा, शेलटर हाऊस, अंडर ग्राउंड केबलिंग ही कामे केली जातील.